Features Pimplas ( "माझा पिंपळास" )
"माझा पिंपळास" app is a step forward to digitally connect the villagers with each other.
It will help connect the villagers for all their important needs including Emergency, Health, Education, Agriculture, Sports, News, Events or any information that they might want to share with each other.
This app will make the village digitally enabled and will put the village in the map of one of the most advanced villages in the country."पिंपळास" पिंपळास गाव पालघर येथील वाडा तालुक्यात वैतरणा नदीचा काठावर बसलेला सुंदर आणी रमणीय गाव आहे.पिंपळास मधे जिल्हा परिषद शाळेची स्थापना सन १९३३ आहे.पुरातन स्वयंभू (प्रकट) श्री हनुमान दगडी मूर्ती स्थापना केलेलं मंदिर आहे.प्राचीन एरजी बाबा जिवंत समाधी मंदिर आहे.गावदेवी मंदिरा शेजारी जून भलं मोठं पिंपळाचे झाड आहे.वैतरणा - पिंजाल या नद्यांचा संगम आहे.
त्या ठिकाणी गरम आणि खाऱ्या पाण्याचा झरा आहे.गवळणीच्या मालामध्ये प्राचीन कोरीव शीलालेख,पाण्याचा लहान कुंड आहे.गावातील वैतरणा नदीच्या तीरावर प्राचीन नागनाथ शिवस्थान आहे.गावामध्ये आशीर्वाद गौ माता शाळा आहे.गावामध्ये सार्वजनिक श्री गणेश उत्सव, श्री नवरात्र उत्सव, श्री हनुमान जयंती उत्सव एक गाव एक उत्सव साजरा करतात.गावातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
भात शेती बरोबर भाजीपाला, कुकुट पालन करणारे युवा शेतकरी जास्त आहेत.गावातील शेतकरी कारली या पिकाने प्रसिद्ध आहेत.लाकूड मेस्त्री, गवंडी, शिवणकाम, मासेमारी ही कामं करणाऱ्यांची संख्या सुद्धा फार आहे.गावांमध्ये केशवसृष्टी सोबतच स्मार्ट गाव फाउंडेशन या दोन संस्था काम करत आहेत.स्वाध्याय परिवार, श्री गजानन महाराज, समर्थ रामदास स्वामी, ओम शांती, वारकरी सांप्रदाय आहेत.गावातील घर कौलारू, विट मातीची बनलेली असून प्रत्येक घरी मातीची चूल, प्रांगणात तुळशीवृंदावन आहे.पारंपारिक साधने जतन केली आहेत.गावातील सर्व आगरी समाज इतर समाजासोबत गुण्यागोविंदाने राहतात.गावात गवळी, चौधरी, भोईर, पाटील, मिसाळ, म्हात्रे, केणे, जाधव, डगला या आडनावाचे लोक राहतात.संस्कृती जतन करणार शेण मातीचे घर आहे.
बांबू शौचालय आहे.वन जमीन मोठ्या प्रमाणात आहे.
औषधी वृक्ष, राष्ट्रीय पक्षी मोर आढळतात.जंगलात राहणारा तेथील जंगली औषधे देणारा अवलिया आहे.गावात पाच फार्म हाऊस,दोन बंगलो स्कीम,रिसॉर्ट आहे.आम्ही आपणास गावात यावे अशी विनंती.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the Pimplas ( "माझा पिंपळास" ) in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above